रुपेरी पडदा गाजवणाऱ्या बिग बींवर का आली जमिनीवर बसून सिनेमा पाहायची वेळ?
![Why is it time to sit on the floor and watch movies on the silver screen Big B?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/535282-amitabh-bachhan-780x470.webp)
महानायक अमिताभ बच्चन हे त्यांच्या सध्या राहणीमानासाठी ओळखले जातात
सिनेसृष्टीत इतकं यश कमवून सुद्धा त्यांनी नेहमीच स्वतःला जमिनीवरच ठेवलं कधी कुठलाही बाऊ केला नाही. बिग बी यांच्या प्रत्येक अदांवर त्यांचे चाहते फिदा आहेत. बॉलीवुड ,टॉलीवूड ,मराठी सिनेसृष्टी सर्वभाषिक प्रेक्षकांच्या मनावर गेली.
अनेक दशकं एकहाती गारुड गाजवणारा भारदस्त आवाज अप्रतिम अभिनेता सर्वगुणसंपन्न बिग बी अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चन म्हटलं की एक भारदस्त आवाज समोर येतो.
करियरच्या सुरवातीला याच भारदस्त आवाजामुळे रिजेक्शन झेलावे लागणारे अमिताभ बच्चन आज आवाजामुळेच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत…
मोठ्या पडद्यासोबतच छोट्या पडदा म्हणजे टीव्ही मध्ये सुद्धा अमिताभ जिचा बोलबाला कायमच आहे . कौन बनेगा करोडपती या शोमध्ये ते आपल्या वैयक्तिक आयुष्यातील खास किस्से सध्या सर्वाना सांगत आहेत आणि प्रेक्षकंसुद्धा ते फार आवडत आहे.
नुकतेच केबीसी च्या सेटवर ‘उचाई’ सिनेमाची टीम पोहचली होती यावेळी पसरवानी खूप[ गप्पा मारल्या आयुष्यातील अनेक पान उलगडली मात्र सर्वांचं लक्ष वेधून घेतल ते अमिताभजी यांच्या एका किस्स्याने !
यावेळी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या हॉस्टेलच्या दिवसातील काही किस्से सांगितले. त्यावेळी त्यांच्याकडे सिनेमा थिएटरमध्ये पाहण्यासाठी पुरेसे पैसे नसायचे आणि म्हणून ते थियेटर मॅनेजरला रिक्वेस्ट करून थियेटर मध्ये जमिनीवर बसून सिनेमा पाहायचे. हे सांगताना अमिताभजींच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. हि दृश्य पाहून उपस्थितांमध्येसुद्धा काही वेळ शांतता पसरली होती.
यशाच्या कितीही उंचीवर पोहोचलो तरी आपली मूळ कधीच विसरायची नसतात हे पुन्हा एकदा अमिताभ बच्चन यांनी दाखवून दिलय.