म्हणजे अमृत; मासिक पाळीचं रक्त पिण्यापासून चेहऱ्याला लावण्यापर्यंत असा उपयोग करते ‘ही’ महिला
![means ambrosia; From drinking menstrual blood to applying it on the face, this woman uses it](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/533651-this-woman-considers-period-blood-to-be-nectar-works-from-drinking-to-applying-it-on-the-face-780x470.jpg)
मुंबई : सोशल मीडियावर नेहमीच कोणत्या ना कोणत्या विचित्र गोष्टी आपण ऐकत असतो. बऱ्याचवेळा काही गोष्टी ऐकून आपण आश्चर्यचकीत होतो. दरम्यान, बार्सिलोनामध्ये एका 31 वर्षीय महिलेनं तिच्या मासिक पाळीच्या रक्ताविषयी एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे. त्या महिलेनं म्हटलं की ती मासिक पाळीच्या रक्ताला अमृतापेक्षा कमी समजत नाही. ही महिला तिचे मासिक पाळीचे रक्त फक्त चेहऱ्याला लावत नाही तर ती हे रक्त पिते. शिवाय या रक्तानं ती पेन्टिंगही करते. याविषयी बोलताना ती महिला म्हणाली की हे रक्त पोषक तत्वांनी पूर्ण असतं आणि म्हणून प्रत्येक स्त्रीनं ते प्यायला हवं. चला तर जाणून घेऊया कोण आहे ही महिला…
या महिलेचं नाव जॅस्मिन एलिसिया ही बार्सिलोनाची आहे. जॅस्मिन ही तेथे पती आणि त्यांच्या अडीच वर्षांच्या मुलासोबत राहते. जॅस्मिन मासिक पाळीविषयी म्हणते की, ‘मासिक पाळीच्या वेळी शरीरातून बाहेर पडणारे रक्ताचा उपयोग ती वेगवेगळ्या पद्धतीनं करते. तिचं म्हणणं आहे की या रक्तात Protein, Iron, Copper आणि Selenium सारखे पोषक घटक असतात. एवढंच नाही तर या मासिक पाळीच्या रक्तात Regenerative cells and Antimicrobials असतात, जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. पीरियड ब्लडचे सेवन केल्याने अनेक आजारांपासून आपले संरक्षण होते.
दरम्यान, जे लोक रोज Junk Food खातात त्यांनी Period Blood चे सेवन करायला नको. ज्यांचं डायट हेल्दी त्या लोकांनी Period Bloodचे सेवन केले तर त्यांना याचा फायदा होतो. जॅस्मिन म्हणाली की ती बऱ्याच काळापासून तिच्या मासिक पाळीच्या रक्ताचे सेवन करत आहे आणि यामुळे ती खूप निरोगी आणि तंदुरुस्त झाली आहे.