अधिकारी, कर्मचा-यामुळेच शहराचा विकास झपाट्याने झाला – महापौर जाधव
पिंपरी – सेवानिवृत्त होणा-या अधिकारी व कर्मचा-यांच्या प्रामाणिक सेवेमुळे पिंपरी-चिंचवड शहराचा विकास झपाट्याने होण्यास मदत झाली आहे असे मत महापौर राहुल जाधव यांनी व्यक्त केले.
पिंपरी-चिंचवड महापालिका सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या ८ तसेच स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या ८ अधिकारी व कर्मचा-यांचा महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते पुस्तक, गुलाब पुष्प व स्मृतिचिन्ह, तसेच सेवाउपदान धनादेश सुपूर्द करुन त्यांचा सन्मान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास उपमहापौर सचिन चिंचवडे, नगरसदस्य अभिषेक बारणे, सहाय्यक आयुक्त चंद्रकांत इंदलकर, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, कर्मचारी महासंघाच्या सचिव चारुशिला जोशी आदी उपस्थित होते.
महापालिका सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्यांमध्ये अतिरिक्त कायदा सल्लागार अॅड. सतिश पवार, कार्यालयीन अधिक्षक मिलिंद कुलकर्णी, भांडारपाल मुख्य लिपिक सायली मुळे, मुकादम रविंद्र कणसे आरोग्य कर्मचारी सुमन जगताप, प्रमिला पटवणे, शिवाजी जाधव तसेच स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्यांमध्ये डॉ. राजेश गोरे, लिपिक शरद हेंद्रे, आरोग्य कर्मचारी कमलाबाई चावरिया, लक्ष्मीबाई वैरागर, ज्योती सूर्यवंशी, शोभा कदम दस्तगीर भोसले, अशोक जाधव यांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले यांनी केले.