TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमुंबई

‘माझ्या मुलीला शिवसेनेला दत्तक देते’

जीवे मारण्याच्या धमकीनंतर सुषमा अंधारेंचे वक्तव्य
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजेच ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याची माहिती समोर येत आहे. सुषमा अंधारे यांनी स्वत: याबाबत माहिती दिली असून, आपल्याला अप्रत्यक्षरित्या धमक्या येत असल्याचे म्हटले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजेच ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याची माहिती समोर येत आहे. सुषमा अंधारे यांनी स्वत: याबाबत माहिती दिली असून, आपल्याला अप्रत्यक्षरित्या धमक्या येत असल्याचे म्हटले. पत्रकार परिषदेत सुषमा अंधारे यांनी हे वक्तव्य केलं. विशेष म्हणजे या जीवे मारणाच्या धमक्यांनंतर सुषमा अंधारे यांनी ‘मी माझ्या मुलीला शिवसेनेला दत्तक देते’ असेही म्हटले.

गुरूवारी वाशीमध्ये महाप्रबोधन मेळाव्यानंतर पार पडलेल्या पत्रकार परिषदेत सुषमा अंधारे यांनी आपल्याला धमकी मिळत असल्याचे विधान केले. तसेच, “मला काही अंतर्गत माहिती समजली आहे. माझ्या जीवाला धोका आहे. त्यामुळे मी माझ्या मुलीला शिवसेनेला दत्तक देते. काल माझ्या घरी अचानक दोन पोलीस आले आणि संरक्षण देतो म्हणाले”, असे वक्तव्य सुषमा अंधारे यांनी केले.

“माझी पाच वर्षांची मुलगी आहे, मला कालपासून काही धोके जाणवत आहेत. काही इनपूट्स आले आहेत. ज्यामध्ये असं समजलं की, घराबाहेर पडू नका. कोणीतरी हल्ला करेल, धक्काबुक्की होईल. पोलिसांचे मला फोन येत आहेत आणि विचारलं जात होतं की तुम्ही सुरक्षित आहात का? मला समजलं नाही की असं का सुरू आहे. मग लक्षात आलं की त्यांच्याकडे काहीतरी गोपनीय माहिती आहे, काहीतरी सुरू आहे”, अशी भाती अंधारे यांनी व्यक्त केली.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सुषमा अंधारे या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांच्यावर चांगलाच निशाणा साधत आहेत. यंदाच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील सुषमा अंधारे यांचे भाषण चांगलेच गाजले होते. त्यानंतर त्यांचे ठाण्यातील प्रबोधन यात्रेच्या कार्यक्रमातील देखील भाषण गाजले. ठाण्यातील भाषणाबद्दल त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button