चंद्रकांत खैरेंच्या अडचणीत वाढ, शिंदे गटाच्या महिला आघाडीकडून पुण्यात तक्रार दाखल
![chandrakant-khairens-problems-increase-complaint-filed-in-pune-by-shinde-groups-mahila-aghadi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/pune-news-94756145-700x470.jpg)
पुणे । एकेरी उल्लेख करून धमकीची भाषा करत बेजवाबदार वक्तव्य आणि अपमान केल्याबद्दल पुणे जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख पूजा रावेतकरांनी यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी एका भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बदल वादग्रस्त व्यक्तव्य केल्याबद्दल पुण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
चंद्रकांत खैरेंनी मुख्यमंत्री शिंदेचा एकेरी उल्लेख करत शिंदेंना उलटं टांगलं पाहिजे, असं वक्तव्य केलं होतं. एकेरी भाषा वापरून धमकीची भाषा करत बेजबाबदार, अपमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप करत उत्तमनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाने आता खैंरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
शिवसेना शिंदे गटाच्या पुणे जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख पूजा रावेतकरांनी यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना खैरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा एकेरी उलखे केला. आम्हाला मुख्यमंत्री बाबत नितांत आधार आहे. त्याचसोबत खैरे बोले या रिक्षावाल्याकडे कुठून आले एवढे पैसे? अशा शब्दात मुख्यमंत्रांचा अपमान केल्याने खैरेंच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
चंद्रकांत खैरेंनी केलेल्या वक्तव्याचा निषेध राज्यात सगळीकडे होऊ लागला आहे. अनेक शहरात त्यांच्या विरोध तक्रार दाखल करण्यात येत आहेत. या वक्तव्यावर खैरेंनी स्पष्टीकरण दिले आहे. ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे डावपेच खूप दिवसांपासून सुरू होते. इथेच जर आनंद दिघे साहेब असते तर त्यांना उलट टांगलं असतं, असं चंद्रकांत खैरे बोलले. मात्र आता त्यांच्या वक्तव्याचे पडसाद कसे उमटतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.