“पांढऱ्या केसांचा भिकारी…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे निर्माते स्वतःबाबत असं का बोलले?
!["White Haired Beggar..." Why did the makers of 'Maharashtra's Comedy Fair' say this about themselves?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/show-marathi-780x470.jpg)
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाचे आज लाखो चाहते आहेत. या कार्यक्रमामध्ये काम करणारी सगळीच कलाकार मंडळी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करतात. समीर चौघुले, वनिता खरात, नम्रता संभेराव, गौरव मोरे, प्रसाद खांडेकर अशा विनोदवीरांमुळे हा कार्यक्रम प्रेक्षक आवडीने पाहतात. पण या कार्यक्रमामागे दोन व्यक्ती सतत खंबीरपणे उभ्या आहेत. ते म्हणजे या कार्यक्रमाचे निर्माते सचिन गोस्वामी व सचिन मोटे. यांचाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोनी मराठी वाहिनीने दर रविवारी ‘गॉसीप आणि बरंच काही..!’ हा कार्यक्रम सुरु केला आहे. या कार्यक्रमामध्ये काही कलाकारमंडळी हजेरी लावताना दिसतात. तसेच दिलखुलास गप्पा मारतात. या कार्यक्रमाच्या नव्या भागामध्ये निर्माते सचिन गोस्वामी व लेखक सचिन मोटे हजेरी लावणार आहेत. या कार्यक्रमाचा प्रोमो सोनी मराठीने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये सुत्रसंचालकाबरोबर दोघंही गप्पा मारताना दिसत आहेत. यादरम्यान “पांढऱ्या केसांचा राजकुमार असं तुम्हाला म्हटलं जातं.” असं सुत्रसंचालक सचिन गोस्वामी यांना म्हणतो. या प्रश्नावर सचिन गोस्वामी अगदी मजेशीर उत्तर देतात. ते ऐकून सचिन मोटे व सुत्रसंचालकालाही हसू अनावर होतं.
सचिन गोस्वामी म्हणतात, “ही समीर चौघुलेची कल्पना आहे. निर्मात नसतो तर पांढऱ्या केसांचा भिकरीही म्हटलं असतं.” त्यांचं हे उत्तर ऐकून सगळेच हसू लागतात. या कार्यक्रमाच्या नव्या भागामध्ये ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांबाबत गुपित उलगडणार असंच दिसतंय.