Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीअध्यात्म । भविष्यवाणीआंतरराष्ट्रीयक्रिडाताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत महाराष्ट्राच्या राही पखालेला सुवर्ण, सिद्धी ब्रीडला कांस्य पदक

बडोदा । महाईन्यूज। वृत्तसंस्था ।
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली आहे. महिला गटात महाराष्ट्राच्या राही पखाले हिने सुवर्णपदक जिंकले तर सिद्धी ब्रीड हिने कांस्य पदक जिंकले. आत्तापर्यंत महाराष्ट्राने दोन सुवर्ण व एक कांस्य अशी तीन पदकांची कमाई केली आहे.

महिला गटात जिम्नॅस्टपटू राही पखाले हिने 42.8 गुणांची कमाई करत सुवर्णपदक पटकावले. शेख यासीन हिने 40.5 गुण मिळवून रौप्यपदक संपादन केले. महाराष्ट्राच्या सिद्धी ब्रीड हिने 40.3 गुण संपादन करुन कांस्य पदक मिळवले. मिलम देवी (32.2 गुण) व ईशा ठाकोर (17.3) हे अनुक्रमे चौथ्या व पाचव्या स्थानावर राहिले. या कामगिरीबद्दल कोच संजय मोरे यांनी आनंद व्यक्त केला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button