Breaking-newsक्रिडाताज्या घडामोडीमहाराष्ट्र
धक्कादायक : पंढरपूरच्या पहिलवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने कोल्हापुरात मृत्यू
![Shocking: Pahlwan of Pandharpur dies of heart attack in Kolhapur](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/pandharpur.jpg)
पंढरपूर : कुस्तीचा सराव करून झाल्यानंतर अंघोळ करताना हृदयविकाराच्या झटक्याने पंढरपुरातील पहिलवानाचा कोल्हापुरात मृत्यू झाला आहे. मारुती सुरवसे (वय 23, रा. वाखरी, ता. पंढरपूर) असे मृत पहिलवानाचे नाव आहे.
राज्यातून अनेक तरुण कोल्हापुरात जाऊन नामांकित मल्लाच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचा सराव करतात. मारुती सुरवसे यानेही रात्री कुस्तीचा सराव करून अंघोळ करीत असताना त्याच्या छातीत दुखायला लागले. मारुतीला रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. हा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याचे स्पष्ट झाले आहे.