लहान मुलांच्या लाडक्या ‘चिंटू फाउंटन पेन’चे अनावरण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/09/Fountain-Pen-Pravin-Tarade-780x470.jpg)
लहान मुलांच्या लाडक्या ‘चिंटू फाउंटन पेन’चे अनावरण
पुणे । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
- प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक अभिनेते प्रवीण तरडे यांची उपस्थिती
- मुलांसाठी खास लाडक्या चिंटूचा फाऊंटन पेन बाजारात दाखल
पुणे । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी । लहान मुलांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत सगळ्यांना लाडका असणारा चिंटू हा आता खास वेगळ्या रूपामध्ये पाहायला मिळणार आहे कॉमिक बूक-डेच्या निमित्ताने व्हिनस ट्रेडर्स इथे प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक अभिनेते प्रवीण तरडे यांच्या हस्ते लहान मुलांच्या लाडक्या चिंटू फाउंटन पेनचे अनावरण संपन्न झाले. यावेळी सुरेंद्र व प्रमोद कर्मचांदनी , प्रवीण तरडे व त्यांचा परिवार,मनोहर देसाई, सागर पवार, हेमंत गुजराती, सुरेंद्र देशमुख, चित्रा वाडेकर, चारुहास पंडित व त्यांचा परिवार तसेच रणजित जगताप व घनश्याम देशमुख उपस्थित होते. यावेळी युवा संवादशी संवाद साधताना प्रवीण तरडे म्हणाले की चिंटूमुळे माझं बालपण अत्यंत समृद्ध झाले तसेच माझ्या मुलाला देखील आता गोडी लागलेली आहे वीस वर्षांपूर्वी सगळ्या गोष्टी साहित्यातील एकत्रितपणे पाहायला मिळणे तीदेखील क्रेझ होती ती आम्ही अनुभवली. तसेच चारुहास पंडितांचे देखील त्यांनी आभार मानले. याप्रसंगी चिंटू चे निर्माते चारुहास पंडित यांनी त्यांच्या अनोख्या शैलीतून बाळगोपाळांना चिंटू रेखाटून दाखवला.