भीषण ः पुण्याच्या आंबेगाव दरीत शालेय बस कोसळली, 44 विद्यार्थी जखमी
पुणे । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
एक शालेय बस दरीत कोसळून 44 विद्यार्थी जखमी झाल्याची घटना पुण्यात घडली. पुण्याच्या आंबेगाव दरीत ही शालेय बस कोसळली आहे. आंबेगाव तालुक्यातील मुक्ताई प्रशाला पिंपळगावच्या शाळेची ही बस होती. या अपघातात शिक्षकांचाही समावेश आहे. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत बचावकार्याला सुरूवात केली. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले असून, रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुक्ताई प्रशाला पिंपळगाव शाळेचे विद्यार्थी गिरवली येथील आयुका दुर्बीण पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी प्रवासात शाळेची बस दरीत कोसळली. बसमध्ये 44 विद्यार्थी आणि 3 शिक्षक होते. बचाव पथकाला माहिती मिळताच त्यांनी तातडीने बचाव कार्य करण्यास सुरुवात केली. आणि सर्व मुलांना बाहेर काढण्यात आले.
त्यामधील सर्वांना ॲम्बुलन्स द्वारे सर्वांना ग्रामीण रुग्णालय घोडेगाव येथे दाखल करण्यात आले आहे. तर 4 मुलांना मंचर येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. सर्वांच्या प्रकृतीबाबत वैद्यकीय सुविधा देण्याचे कामकाज सुरू झाले आहे.