उद्धव ठाकरेंना मोठा धक्का: निवडणूक आयोगासमोर सुरू असलेल्या कार्यवाहीला स्थगिती नाही; कोर्टाचा निर्णय
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/09/lIVE-lOW-UDHAV-THAKRE-EKNATH-SHINDE-780x470.png)
नवी दिल्ली । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
शिंदे गटाकडून करण्यात आलेल्या अर्जावरील सुनावणी सुप्रीम कोर्टाने पूर्ण केली आहे. शिवसेना पक्ष खरा कोणाचा, या प्रश्नावर केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुरू असलेल्या कार्यवाहीला स्थगिती नसेल, असा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून निवडणूक आयोगाला पक्षचिन्हाबाबतचा निर्णय घेण्यापासून रोखावं, अशी मागणी करण्यात आलेली होती. मात्र कोर्टाने ही मागणी मान्य न केल्यान ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगासमोरील कार्यवाहीला स्थगिती नसेल, असं सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायमूर्तींच्या पूर्णपीठाने सुनावणीअंती दिलेल्या आदेशात स्पष्ट केलं आहे. मुंबई महापालिकेसह अन्य निवडणुका तोंडावर असताना केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय काय येतो आणि शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत काय आदेश होतो, त्याबद्दल आता मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
लोकशाहीत बहुमताला महत्त्व असतं, एकनाथ शिंदेंची सुप्रीम कोर्टाच्या निकालावर पहिली प्रतिक्रिया
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत करत असल्याचं म्हटलं. लोकशाहीत बहुमताला महत्व असतं, बहुमत आमच्याकडे आहे. विधानसभा आणि लोकसभेत बहुमत आमच्याकडे आहे. देशात जे काही निर्णय होतात ते कायदे, राज्यघटना यांच्याप्रमाणं होतं असतात. निवडणूक आयोग स्वतंत्र यंत्रणा आहे. काही निर्णय कोर्टात होतात, काही निर्णय निवडणूक आयोगात होतात. निवडणूक आयोगानं काही ऐकू नये,असं काही जणांना वाटत होतं. मात्र, सुप्रीम कोर्टानं आज निवडणूक आयोगाचा मार्ग मोकळा केला आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
आमची बाजू जी आहे, आम्ही कुठलाही निर्णय कायद्याच्या विरोधात जाऊन घेतला नाही. सुप्रीम कोर्टानं जो निर्णय घेतला आहे त्याचा आदर करतो. आम्हाला ज्या निलंबनाच्या नोटिसा दिल्या होत्या त्या चुकीच्या होत्या. विधानसभा उपाध्यक्षांवर अविश्वास ठराव प्रलंबित होता. महाविकास आघाडी सरकार मनाला वाटेल त्याप्रमाणं काम करत होतं. हे प्रकरण न्यायालयात असल्यानं आम्ही त्याबद्दल जास्त भाष्य करणार नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
नवी दिल्ली : शिंदे गटाकडून करण्यात आलेल्या अर्जावरील सुनावणी सुप्रीम कोर्टाने पूर्ण केली आहे. शिवसेना पक्ष खरा कोणाचा, या प्रश्नावर केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुरू असलेल्या कार्यवाहीला स्थगिती नसेल, असा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून निवडणूक आयोगाला पक्षचिन्हाबाबतचा निर्णय घेण्यापासून रोखावं, अशी मागणी करण्यात आलेली होती. मात्र कोर्टाने ही मागणी मान्य न केल्यान ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.