बंजारा ब्रिगेड पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी प्रताप राठोड यांची निवड
![Pratap Rathod elected as Banjara Brigade Pimpri Chinchwad City President](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/09/Banjara-samaj-e1663614606219.jpeg)
पिंपरी-चिंचवड । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
बंजारा ब्रिगेड पुणे जिल्हा आढावा विभागीय अध्यक्ष जयवंता राठोड तसेच जिल्हा अध्यक्ष दिलीप जाधव यांच्या नेतृत्वात आणि जिल्हा समन्वयक विजय राठोड व विभागीय समन्वयक सूर्यकांत राठोड यांच्या प्रमुख मार्गदर्शनात रविवार दिनांक 18 सप्टेंबर रोजी आढावा बैठक पार पडली. या बैठकीत संघटनेचे पुढील ध्येय धोरण ठरवण्यात आले. तसेच जिल्हयातील संघटनात्मक आढावा घेण्यात आला. त्याच बरोबर बंजारा ब्रिगेडच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी युवा सामजिक कार्यकर्ते प्रताप राठोड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी बंजारा ब्रिगेडचे राहुल चव्हाण तसेच डौंड तालुका अध्यक्ष मिथुन राठोड शिरूर तालुका अध्यक्ष अमोल राठोड तसेच सामजिक कार्यकर्ते देवराज आडे बाळासाहेब जाधव गजानन चव्हाण आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे निवेदन मिथुन राठोड यांनी केले.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/09/Banjara-samaj-768x768-1-1.jpeg)