पुणे ः चाकणजवळ 180 हेक्टरमध्ये मल्टी मॉडेल लॉजेस्टिक पार्कची निर्मिती; नितीन गडकरींची मोठी घोषणा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/09/Nitin-Gadkari.png)
पुणे । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
चांदणी चौकातील वाहतूक कोंडीची दखल घेतली त्यानंतर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुद्धा याच संदर्भांत एक बैठक बोलावली आणि ही बैठक झाल्यानंतर नितीन गडकरी यांची पत्रकार परिषद सुद्धा झाली. पुण्यातील चांदणी चौकातील(pune chandani chowk )वाहातूक कोंडी दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याच संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा चांदणी चौकातील वाहतूक कोंडीची दखल घेतली त्यानंतर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुद्धा याच संदर्भांत एक बैठक बोलावली आणि ही बैठक झाल्यानंतर नितीन गडकरी यांची पत्रकार परिषद सुद्धा झाली. यावेळी त्यांनी पुण्यातील रस्ते आणि विकास योजनांचा आढावा घेतला.
पुणेशहरामधून अनेक राज्यातील अनेक शहरांमध्ये मार्ग जातात. त्या मार्गात कोणते बदल केले जातील या संदर्भांत नितीन गडकरी यांनी माहिती दिली. शहर नियोजनानुसार या सगळ्या मार्गाची सुयोग्य रचना होणार आहे. पुणे-शिरुर नगर- औरंगाबाद रस्त्यात तीन मजली उड्डाणपुल सुद्धा होणार असल्याची घोषणा गडकरी(nitin gadkari) यांनी केली. त्याचबरोबर पुण्यातील चांदणी चौकातील पूल पुढील दोन-तीन दिवसात पाडणार आहेत आणि त्यासाठी नवं कामदेखील लवकरच सुरु होणार असल्याचंही गडकरी म्हणाले. जर का हे काम लवकर सुरु झाले तर येत्या जून मध्ये नव्या पुलाचं उद्घाटन करण्यात येईल. असंही गडकरींनी स्पष्ट केलं. पुण्यातील(pune traffic problem) वाहतूक कोंडीचा प्रश्न लक्षात घेऊन जमिनीपासून 100 उंचीवरून उडणाऱ्या बसेसची योजना जाहीर केली आहे. त्यासाठी निधी सुद्धा देण्यात येईल. या सगळ्यात लोकप्रतिनिधींचा सहभाग महत्वाचा असेल असंही ते म्हणाले.
दरम्यान, पुण्यातील काही दुष्काळी भागातुन ते त्यांच्या पुढील कामासाठी जाणार आहेत आणि त्याच दुष्काळी भागाचा विकास होण्यासाठी हायवेची निर्मिती होणार आहे. हायवेच्या निर्मितीने दुष्काळी भागाचा विकास होण्यासाठी मदत होणार आहे. आणि या हायवेची अलाईनमेंट झाली आहे. त्याच बरोबर पुणे – औरंगाबादची सुद्धा अलाईनमेंट झाली आहे. असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. या बैठकीत गडकरी यांची पुणे येथील महामार्ग आणि मनपा अधिकारी यांच्याशी चर्चा झाली.
दरम्यान पुण्यात सुद्धा इलेक्ट्रिक डबलडेकर बस(electric double decker bus) सेवा करण्याचा विचार सुरु आहे. नॅशनल हायवेच्या बाजूला जागा दिली तर त्या ठिकाणी लॉजीस्टीक पार्क सुद्धा बांधण्याची तयारी आहे आणि त्या साठी तब्बल 2 लाख कोटींचा खर्च येणार आहे आणि तो खर्च करण्यासाठी तयार सुद्धा आहोत असंही गडकरी म्हणाले. त्यासाठी एमआयडीसीसोबत सामंजस्याचा करार सुद्धा झाला आहे. हा प्रकल्प आम्ही संयुक्तपणे राबवत आहोत असंही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले. दरम्यान, चाकण एमआयडीसी पासून 27 किमी अंतरावर असलेल्या पावलेवाडी येथे 180 हेक्टरात मल्टी मॉडेल लॉजेस्टिक पार्क सुद्धा उभारण्यात येणार आहे.