Uncategorizedताज्या घडामोडी
नागपूरमध्ये विद्यार्थ्यांनी भरलेल्या स्कूल बसचा भीषण अपघात
नागपूर : शहरात स्कूल बसचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. स्कूल बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात पडल्याची घटना उघडकीस आली आहे. या अपघातावेळी स्कूल बसमध्ये १६ विद्यार्थी देखील होते. सुदैवाने या अपघातात बसमधील विद्यार्थी थोडक्यात बचावले आहेत. बेसा घोगली मार्गावर पोदार इंटरनॅशनल स्कूल बस ही खड्ड्यात उलटली आहे. सुदैवाने या अपघातात प्राणहानी झालेली नाहीये. मात्र, दोन विद्यार्थी जखमी झाले आहेत. शहरात होणाऱ्या पावसामुळे या भागातील शाळांना सकाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.