Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
स्वाईन फ्लुने एका महिलेचा मृत्यु
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/swine-flu-h1n11-e1424415900379.jpg)
एका दिवसात तब्बल सात रुग्ण आढळले
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी (दि. 18) स्वाईन फ्लुने एका 43 वर्षीय महिला रुग्णांचा मृत्यु झाला. तर सात नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. 12 जणांच्या घशातील द्रव तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. एक जण व्हेंटिलेंटरवर आहे. 24 संशयितांना टॅमी फ्लूच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. या वर्षी दोन रुग्णांचा मृत्यु झाला. तर 17 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे.
स्वाईन फ्ल्यू संसर्गजन्य आजार आहे. थंडीमध्ये पोषक वातावरण असल्यामुळे स्वाईन फ्ल्यूची मोठ्या प्रमाणात वाढ होत असते. यंदाच्या वर्षी स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या कमी होती; मात्र सध्या त्यामध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे. या महिन्यात सुमारे आठ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यंदाच्या वर्षी 17 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. संशयित रुग्णांना टॅमी फ्लूच्या गोळ्यांचे वाटप केले जाते. यंदाच्या वर्षी अद्यापपर्यंत 3 हजार, 732 जणांना टॅमी फ्लूच्या गोळ्या देण्यात आल्या आहेत. शनिवारी (दि. 18) 12 जणांच्या घशातील द्रव तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. अद्यापपर्यंत एकूण 91 जणांच्या घशातील द्रव तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. अद्यापर्यंत तीन लोकांना व्हेटिंलेटवर ठेवण्यात आले आहे.
या वर्षी स्वाईन फ्लूच्या रुग्णांच्या घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती; मात्र वातावरणातील बदलाने स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढतच असल्याचे चित्र आहे. 43 वर्षीय महिलेचा मृत्यु झाला आहे. 16 ऑगस्टला संबंधीत महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच दिवशी व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले. 17 ऑगस्ट रोजी महिलेच्या घशातील द्रव तपासणीसाठी पाठविण्यात आला. त्याच दिवशी स्वाईन फ्लू झाल्याचा पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला. उपचार सुरू असताना संबंधीत महिलेचा मृत्यु झाला. वाढत्या स्वाईन फ्लूच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.