‘दख्खन का ताज’ अशी ओळख असलेल्या ‘बीबी का मकबऱ्या’च्या ८४ एकर जमिनीची मोजणी मोठ्या पोल्स बंदोबस्तात बुधवारी पूर्ण
![Counting of 84 acres of land of 'Bibi Ka Maqbara', popularly known as 'Dakkhan Ka Taj', was completed on Wednesday amid massive polls.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/07/Counting-of-84-acres-of-land-of-Bibi-Ka-Maqbara-popularly-known-as-Dakkhan-Ka-Taj-was-completed-on-Wednesday-amid-massive-polls..jpg)
औरंगाबादः ‘दख्खन का ताज’ अशी ओळख असलेल्या ‘बीबी का मकबऱ्या’च्या ८४ एकर जमिनीची मोजणी मोठ्या पोल्स बंदोबस्तात बुधवारी (२७ जुलै) पूर्ण करण्यात आली. परिसरातील काही अतिक्रमणधारकांनी मोजणीला विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी समजवल्यावर त्यांचा विरोध मावळला.
नगर भूमापन विभागाने ‘बीबी का मकबरा’च्या नावाने पीआर कार्डदेखील तयार करून दिले. पीआर कार्ड मिळाल्यावर पुरातत्त्व विभागाने नगर भूमापन विभागाकडे अर्ज करून जमिनीची मोजणी करण्याची मागणी केली. त्यासाठी दहा लाख २७ हजार रुपये शुल्कही भूमापन कार्यालयाकडे भरले. त्यानंतर २० जुलैपासून नगर भूमापन कार्यालयाने पुरातत्त्व विभागाच्या सहकार्याने जमिनीच्या मोजणीचे काम सुरू केले. बुधवारी (२७ जुलै) नगर भूमापनचे अधिकारी पुन्हा मोजणीसाठी आले, तेव्हा काही अतिक्रमणधारकांनी त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला. मोजणीला विरोध होणार हे गृहित धरल्यामुळे पुरातत्त्व विभागाने पोलिस बंदोबस्ताची मागणी केली होती. पोलिस आयुक्तांनीदेखील मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त उपलब्ध करून दिला. मोजणीस विरोध करणाऱ्यांना रोखून पोलिसांनी कारवाई करण्याचा इशारा दिला. त्यानंतर अतिक्रमणधारकांनी नरमाईची भूमिका घेतली. मकबऱ्याच्या बाहेरच्या जमिनीची मोजणी झाल्यावर आता आतील बाजूने मोजणी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.