केरळच्या पूरामुळे जाॅन अब्राहम झाला व्यथित
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/john3.jpg)
- पूरग्रस्तांना मदत करण्याचे चाहत्यांना केले आवाहन
केरळमधील पावसामुळे तेथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. आतापर्यंत ७३ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत अभिनेता जाॅन अब्राहमचे एक विधान आले आहे. जाॅन ने म्हटले आहे की, ‘मी केरळमध्ये आलेल्या पूरामुळे खूप व्यथित झालो आहे’. जाॅनच्या केरळशी लहानपणांच्या अनेक आठवणी आहेत. त्याने गुरूवारी सकाळी लोकांना अावाहन केले की तुम्ही मुख्यमंत्री निधी मध्ये दान करा त्यामुळे पूरग्रस्त लोकांना मदत केली होईल.
जाॅन म्हटला की, ‘केरळमध्ये सध्या पावसामुळे जे काही घडत आहे, त्यामुळे मी व्यथित झालो आहे. केरळशी माझ्या लहानपणीच्या अनेक आठवणी आहेत. कृपया पुढे या आणि मुख्यमंत्री निधीमध्ये दान करा. त्यामुळे पूरग्रस्तांना मदत होईल’.
केरळमधील पावसामुळे आलेल्या पूरामुळे गुरूवारी १२ जण मृत झाले आहेत. पूर्ण केरळमध्ये बुधवार रात्रीपासून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.