#Covid-19: शहरात कोरोना रूग्ण संख्येत मोठी वाढ ; अतिदक्षता विभाग व विलगीकरण कक्ष सुरू
![शहरात कोरोना रूग्ण संख्येत मोठी वाढ; महापालिकेच्या आकुर्डीतील रूग्णालयात अतिदक्षता विभाग व विलगीकरण कक्ष सुरू](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/शहरात-कोरोना-रूग्ण-संख्येत-मोठी-वाढ-महापालिकेच्या-आकुर्डीतील-रूग्णालयात-अतिदक्षता.jpg)
पिंपरी : राज्यात कोरोनाने पुन्हा आपले डोकं वर काढले आहे. पिंपरी चिंचवड शहरातही रूग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यापार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेने आकुर्डीतील रूग्णालयात अतिदक्षता विभाग व विलगीकरण कक्ष सुरू केला असल्याची माहिती सहा. आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी दिली आहे.
महापालिका हद्दीत सध्या कोविड रूग्ण संख्येत वाढ होत आहे. या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कै.ह.भ.प. प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरियल रुग्णालय, आकुर्डी या ठिकाणी रुग्णांवर उपचाराकामी १० खाटांचे अतिदक्षता विभाग व ४० खाटांचे विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आलेला आहे.
कोविड बाधित रुग्णांना सदर रुग्णालयात दाखल होण्याकरिता पिंपरी चिंचवड महापालिकेच्या इतर रुग्णालयांकडून संदर्भ चिठ्ठी घेणे आवश्यक असेल, तसेच गरजेनुसार खाटांची संख्या वाढविण्यात येईल, असे डॉ. गोफणे यांनी म्हटले आहे. शहरात आज (दि.२३) कोरोनाचे १९७ पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. शहरात सध्या ७१६ कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी ६७९ रूग्ण होम क्वारंटाईन आहेत. तर १८ बाधित रूग्ण रूग्णालयात उपचार घेत आहेत.