ताज्या घडामोडीमुंबई

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; मुंबईतील दोघे जागीच ठार, चौघे जखमी

सिंधुदुर्ग | मुंबईतील लोअर परळवरून गोव्याकडे कारने जात असताना मुंबई-गोवा महामार्गावर साळीस्ते जिल्हा परिषदेच्या शाळेसमोरील दुभाजकामधील ओहोळावरील पुलाच्या कठड्यावर टोयाटो कार आदळून भीषण अपघात झाला. या अपघातात कारचालकासह दोघे जण ठार तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास झाला. अपघातातील जखमी व मृत हे मुंबईतील प्रभादेवी आणि अंधेरी येथील असल्याची माहिती आहे.

या अपघाताबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संतोष पांडुरंग हरमलकर (४८, प्रभादेवी) हे परळवरून मुलगी आकांक्षा (२३), भाचा दीप कासले (२१, मूळ रा.सोनवडे) व अन्य एकजण असे चौघेजण गोव्याला निघाले होते. रत्नागिरी येथे दुपारी मित्राकडे जेवण करून ते सायंकाळी गोव्याकडे निघाले. महामार्गावर सायंकाळी साळीस्त्याजवळ आले असता जिल्हा परिषद शाळेसमोरील महामार्गावर ओहोळावर बांधलेल्या दुभाजकवरील कठड्यावर येऊन कार आदळली. कार भरधाव वेगाने असल्याने कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. तर ही कार कठड्यावर आदळल्यानतंर महामार्गावरून जाणार्‍या दुसर्‍या कारवरही आदळली. त्या कारचेही नुकसान झाले. या अपघातात चौघेजण गंभीर जखमी झाले. त्यातील दोघांचा मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना बाहेर काढत त्यांना कासार्डे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. अपघातातील गंभीर जखमी आकांक्षा हरमलकर व दीप कासले या दोघांना ओरोस जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर मदत कार्यासाठी साळीस्तेतील मैथिली कांबळे, चंद्रकांत हरयान, समीर कुलकर्णी, संजय बारस्कर, प्रभाकर ताम्हणकर, पो. पा. गोपाळ चव्हाण, मंगेश कांबळे, वैभव कांबळे, सचिन ताम्हणकर आदी स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेतली.

अपघाताची माहिती मिळताच कणकवली पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंडे, कॉ. रूपेश गुरव तसेच वाहतूक पोलीस घटनास्थळी आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी कणकवली उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले. रात्री डीवायएसपी विनोद कांबळे, पोलिस निरीक्षक राजेंद्र हुलावळे यांनीही उपजिल्हा रूग्णालयात येऊन अपघाताची माहिती घेतली.

महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून अपघाताची संख्या वाढली असून पोलीस व संबंधित यंत्रणेने याची गंभीर दखल घेऊन उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button