पिंपरी / चिंचवड
नोकरी डॉट कॉम वरून बोलत असल्याचे सांगून २७ हजारांची फसवणूक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/calling-45_201901179199.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
नोकरी डॉट कॉम वरून बोलत असल्याचे सांगून अनोळखी व्यक्तीने एका व्यक्तीची २७ हजार २७० रुपयांची फसवणूक केली. ही घटना २८ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी पिंपरी येथे घडली.
अमरजित सिंग मनजीत सिंग झास (वय ३४, रा. पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 9718736892 या मोबाईल क्रमांक धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोळखी व्यक्तीने 9718736892 या क्रमांकावरून फिर्यादी यांना फोन केला. तो naukri.com वरून बोलत असल्याचे त्याने फिर्यादी यांना सांगितले. फिर्यादी यांना naukricustomerrefund.com वरून एक अॅप डाउनलोड करायला लावले. त्यांनतर फिर्यादी यांची २७ हजार २७० रुपयांची फसवणूक केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.