पिंपरी / चिंचवड
गोडाऊन मधून दीड लाखांचे नळ चोरीला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/water-tab.jpg)
पिंपरी | प्रतिनिधी
गोडाऊन मधून अज्ञात चोरट्यांनी एक लाख 49 हजार 400 रुपयांचे नळ फिटिंगचे साहित्य चोरून नेले. ही घटना 8 ते 10 एप्रिल या कालावधीत मावळ तालुक्यातील कातवी येथे घडली.
नितीन मोहनलाल जैन (वय 50, रा. पुणे) यांनी याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कातवी येथे फिर्यादी यांनी त्यांच्या गोडाऊन मध्ये नळ आणि नळ फिटिंगचे साहित्य ठेवले होते. अज्ञात चोरट्यांनी गोडाऊनचे कुलूप तोडून आतील एक लाख 49 हजार 400 रुपये किमतीचे नळ आणि नळ फिटिंगचे साहित्य चोरून नेले. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.