Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
“पार्किंग पॉलिसी” विरोधात सामाजिक संघटनांचे आंदोलन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/0d7c00c73e4e7c9cd40c863e1cb104f7_XL.jpg)
पिंपरी – महापालिकेतील सत्ताधा-यांनी शहरवासियांवार लादलेली ‘पार्किंग पॉलिसी’ जाचक असल्याचा आरोप करत शहरातील विविध सामाजिक संघटनांनी आज शुक्रवारी (दि. 20) पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन केले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची जुलै महिन्याची सर्वसाधरण सभा आज घेण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर ग्राहक हक्क संघर्ष समिती, रिपब्लिकन संघटना, लोकशाहीर संघटना यांच्यासह विविध संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. धम्मराज साळवे, अमोल उबाळे, अंजली गायकवाड, सतिश कदम, दिपक खैरणार, अजय लोंढे सहभागी झाले होते.
जाचक पॉलीसी लादणाऱ्या सत्ताधा-यांचा निषेध, महापौरांनी राजीनामा द्यावा, अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या.