TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
पिंपरी-चिंचवड शहरात 40 फिरती शौचालये; साडेचार कोटींचा खर्च
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने 40 फिरती शौचालये खरेदी करण्यात येणार आहेत. ही शौचालये खरेदी करण्यासाठी 4 कोटी 44 लाख रुपये खर्च होणार आहेत.
पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या 25 लाखांच्या घरात गेली आहे. दिवसेंदिवस शहराची लोकसंख्या वाढत आहे. शहरात कामाधंद्यानिमित्त येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी आहे. रोजंदारीवर काम करणारा गोरगरीब वर्ग शहरातील चाळींमध्ये एखाद्या भाड्याच्या खोलीत वास्तव्य करतो. शहरात सुमारे 71 झोपडपट्ट्या आहेत. या झोपडपट्ट्यांमध्ये हजारो कुटुंबे वसलेली आहेत. येथील रहिवाशांना मूलभूत सोयी-सुविधा महापालिकेमार्फत पुरविण्यात येतात. झोपडपट्टी तसेच दाट लोकवस्तीच्या परिसरात सार्वजनिक शौचालयांची संख्या अपुरी असल्याने महापालिकेमार्फत फिरती शौचालये उपलब्ध करून देण्यात येतात.