केंद्र सरकार गंगा नदीचे मैलापाणी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनला विकणार ?
![Central government to sell Ganga effluent to Indian Oil Corporation?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/idian-oil.png)
नवी दिल्ली | केंद्र सरकारकडून गंगा नदीच्या शुद्धीकरणाचे काम सुरु असून त्यासाठी वेगवेगळ्या योजनाही राबवत आहे. गंगेचे शुद्धीकरण केल्यानंतर त्यातून उपलब्ध होणार्या मैला पाण्याची विक्री करून पैसे कमावण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. हे मैलापाणी लवकरच इंडियन ऑइल कॉर्पोरेशनला विकण्याची शक्यता आहे.
गंगेच्या खोर्यातून दररोज अंदाजे 12 अब्ज लिटर एवढ्या मोठ्या प्रमाणात मैलापाणी जमा होऊ शकण्याची शक्यता आहे. याबाबत बोलताना ‘नॅशनल मिशन फॉर क्लिन गंगा’चे (एनएमसीजी) महासंचालक अशोककुमार म्हणाले की, ‘साधारपणे महिनाभरात ही मैला पाण्याच्या विक्रीची प्रक्रिया पूर्ण होईल. आम्ही या प्रकल्पाची मथुरेतून सुरूवात करत आहोत. येथे दररोज दोन कोटी लिटर एवढे पाणी ‘आयओसीएल’ला देण्यात येईल. याच भागामध्ये ‘इंडियन ऑइल’चा तेल शुद्धीकरण कारखाना आहे. प्रक्रिया झाल्यानंतर शिल्लक राहिलेले मैला पाणी गरजेनुसार पुरविण्यात येईल.