शासनाच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त आयोजित प्रदर्शनास सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची भेट
![Exhibition organized on the occasion of the biennial of the state Social Dhananjay Munde visit](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/munde-mumbai.jpeg)
‘दोन वर्षे जनसेवेची, महाविकास आघाडीची’ या संकल्पनेवर आधारित प्रदर्शन
मुंबई । प्रतिनिधी
शासनाच्या द्विवर्षपूर्ती निमित्त गेल्या दोन वर्षात शासनाने केलेल्या कामगिरीवर आधारित माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात उभारलेल्या चित्रमय प्रदर्शनास सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी भेट दिली. यासंदर्भात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे कौतुकही श्री.मुंडे यांनी केले. यावेळी माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक (माहिती व प्रशासन) गणेश रामदासी, संचालक(वृत्त व जनसंपर्क) दयानंद कांबळे यांची उपस्थित होती.
राज्य शासनाला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त विविध विभागांनी घेतलेल्या निर्णयांची माहिती देणारे ‘दोन वर्षे जनसेवेची, महाविकास आघाडीची’ या संकल्पनेवर आधारित प्रदर्शन मंत्रालयात आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन माहितीपूर्ण आणि उपयुक्त असून किल्ल्याच्या भिंतींच्या पार्श्वभूमीवरील मांडणी देखील अतिशय आकर्षक असल्याची प्रतिक्रिया यावेळी श्री मुंडे यांनी व्यक्त केली.
सर्व विभागांनी या दोन वर्षात घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती या चित्रमय प्रदर्शनातून अतिशय आकर्षक पद्धतीने मांडणी करण्यात आली आहे. चिरेबंदी किल्ल्याच्या उंच भिंतीची उत्तुंगता आणि त्या पार्श्वभूमीवरील प्रदर्शन पॅनल यांचा एकत्रित अनुभव घेता यावा यादृष्टीने तयार केलेल्या नाविन्यपूर्ण फिरता ३६० डिग्री सेल्फी पॉईंट आकर्षून घेत असल्याचे श्री. मुंडे यांनी सांगितले.