संभाजी ब्रिगेड ची पुणे जिल्हा कार्यकारणी जाहीर
![Pune District Executive of Sambhaji Brigade announced](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/WhatsApp-Image-2022-03-09-at-6.06.04-PM-1.jpeg)
पिंपरी-चिंचवड | दिनांक ८ मार्च २०२२ रोजी संभाजी ब्रिगेड पुणे उत्तर जिल्हा कार्यकारिणी निवड बैठक राजवैभव हॉटेल, कळंब -पुणे येथे मोठ्या उत्साहात पार पडली. दोन महिन्यापूर्वी पुणे जिल्हाध्यक्ष पदी गणेश दहिभाते यांची निवड राज्यकार्यकारिणी ने केली होती आणि यानंतर त्यांच्या नेतृत्वात तालुका अध्यक्ष आणि जिल्हा कार्यकारिणीच्या पदाधिकारी पदांच्या निवडी करण्यात आल्या तसेच संघटनेने हाती घेतलेल्या ” नवी दिशा नवा विचार ” या उपक्रमाच्या अनुषंगाने उद्योग – व्यवसाय , शासकीय योजना इत्यादी विषयावर प्रमुख उपस्थित यांनी मार्गदर्शन केले. सदर बैठकीस प्रमुख उपस्थिती म्हणून प्रदेश कार्याध्यक्ष – सुधीर राजेभोसले , प्रदेश संघटक – रमेश हांडे , प्रदिप कणसे , पुणे उत्तर जिल्हाध्यक्ष – गणेश दहीभाते इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते .
यावेळी जिल्हाकार्यकारिणी मध्ये जिल्हा कार्यध्यक्ष पदी लहुजी लांडगे, कैलास मुसळे आणि अविनाश करंजे यांची निवड करण्यात आली तर जिल्हा समन्व्यक गौतम डावखर, जिल्हा सचिव गणेश कुंजीर, जिल्हा उपाध्यक्ष विशाल जरे, शरद पोखरकर, विकास पठाडे यांची तर जिल्हा संघटक पदी गणेश गारगोटे, नवनाथ कंधारे, ओंकार बिर्गीकर, मयूर कळमकर, रशीद सय्यद यांच्या निवडी करण्यात आल्या तसेच पुणे जिल्हा उत्तर मधील तालुकाध्यक्षाच्या निवडी यावेळी करण्यात आल्या यामध्ये मावळ तालुकाध्यक्ष आदिनाथ मालपाटे, खेड तालुकाध्यक्ष सूरज टोपे, आंबेगाव तालुकाध्यक्ष स्वप्नील वर्पे, जुन्नर तालुकाध्यक्ष ऋषिकेश वाजगे, शिरूर तालुकाध्यक्ष दिनेश भुजबळ यांची निवड करण्यात आली या कार्यक्रमाचे आभार स्वप्नील वर्पे यांनी मानले.