आंदोलकांना चकवा देत कोश्यारी कार्यक्रमस्थळी रवाना
![The protesters were taken to the Koshyari event,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/Bhagat_Singh_Koshyari_450.jpg)
सोलापूर |राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज सोलापूर दौऱ्यावर होते. राज्यपालांच्या दौऱ्याला शिवप्रेमींनी विरोध केला. यावेळी राज्यपाल समजून आंदोलकांनी पोलिसांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रकार समोर आला. दरम्यान, कोश्यारी यांनी चकवा देत नियोजित कार्यक्रमस्थळी दाखल झाल्याचे पाहायला मिळाले.
छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राज्यपालांच्या दौऱ्याला शिवप्रेमींनी विरोध केला. या आंदोलनापूर्वी राज्यपालांना सोलापूरकडे जातानाही भगवे झेंडे दाखवून निषेध नोंदवण्यात आला होता. भगतसिंग कोश्यारी हे सोलापुरात हेलिकॉप्टरने सकाळी दहाच्या सुमारास पोहोचले. या आंदोलनापूर्वी राज्यपालांना सोलापूरकडे जातानाही भगवे झेंडे दाखवून निषेध नोंदवण्यात आला होता. स्वामी विवेकानंद केंद्र, जुळे सोलापूर येथे ते आपल्या ताफ्यासह रवाना होताना, आसरा चौक येथे जात असताना, शेकडो शिवप्रेमींनी रास्ता रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, दीड हजार पोलिसांच्या फौजफाट्याने या शिवभक्तांना रस्स्त्यावर येऊ दिले नाही.
ताफा जात असताना आंदोलकांनी भगवे झेंडे दाखवून जोरदार घोषणाबाजी करत निषेधाच्या घोषणा दिल्या. त्यावेळी आसरा चौकातील आंदोलकांना अटक करण्यात आली. तरीही जुळे सोलापुरातील उद्घाटन समारंभ संपवून राज्यपाल हे सोलापूर विद्यापीठाकडे निघाले. त्यावेळी पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून छुप्या मार्गाने राज्यपालांना हेलिकॉप्टरमधून विद्यापीठात नेले. त्यामुळं रिकामा ताफा रस्त्यावरून सोलापूर विद्यापीठाच्या दिशेने निघाला. सर्वांच्या नजरा रिकाम्या ताफ्याकडे होत्या. त्याचवेळी मडकी वस्ती येथे डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी रिकाम्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत आडवण्याचा प्रयत्न केला.