कोरोनाची तिसरी लाट आटोक्यात, काळजी करण्याचे कारण नाही – राजेश टोपे
![Corona's third wave caught, no worries - Rajesh Tope](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/Rajesh-Tope.jpg)
जालना | प्रतिनिधी
मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांचा आलेख खाली आला आहे. दैनंदिन रुग्णसंख्या आटोक्यात आल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता तिसरी लाट आटोक्यात आल्याची परिस्थिती झाली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील तिसरी लाट आटोक्यात आल्याचे सांगितले आहे. ‘तिसरी लाट आटोक्यात आली आहे. काळजी करु नका.’ अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.
जालन्यात आज पल्स पोलिओचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी टोपे म्हणाले की, ‘राज्यातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. काळजी करण्याचा विषय नाही. राज्यात सध्या दहा टक्के पण रुग्ण राहिलेले नाहीत.‘ मास्क मुक्तीचा निर्णय विचार करून घेणार असल्याचे यावेळी राजेश टोपे यांनी सांगितले. तिसऱ्या लाटेच्या अनुशंगाने आज राज्यात दहा टक्के पण रुग्ण नाहीत. त्यामुळं तिसरी लाट आटोक्यात आणण्यात राज्य सरकारला यश आले आहे. मात्र कोरोना पूर्णपणे हद्द पार झालाय अशा भ्रमात न राहता मास्क मुक्तीचा निर्णय विचार पूर्वक घ्यावा लागेल, अशी माहिती टोपे यांनी दिली.