पिंपरी-चिंचवड भाजपातर्फे छत्रपती शिवरायांना वंदन
![Pimpri-Chinchwad BJP pays homage to Chhatrapati Shivaji](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/2833baee-5fb9-4f42-beff-8cf7754c5892.jpg)
पिंपरी । प्रतिनिधी
शिवजयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करण्यात आले.भाजपा मुख्य जनसंपर्क कार्यालय येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस राजू दुर्गे, नगरसेवक शीतल शिंदे, जिल्हा चिटणीस संजय भंडारी, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष सुभाष सरोदे अनु.जाती मोर्चा सरचिटणीस यशवंत दणाने, प्रदेश सचिव अनु.जाती मोर्चा कोमल शिंदे, नेताजी शिंदे, संतोष रणसिंग, सुधाकर सुतके, युवा मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अजित कुलथे, युवा मोर्चा सरचिटणीस दीपक नागरगोजे, बेटी बचाओ – बेटी पाढाओ अभियान संयोजक मुक्ता गोसावी, ओबीसी सेलचे सरचिटणीस कैलास सानप, गुजराथी सेल अध्यक्ष मुकेश चुडासमा, कार्यालय प्रमुख संजय परळीकर आदी उपस्थित होते.
आमदार महेश लांडगे म्हणाले की, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महान कार्याचा परिचय नव्या पिढीला होण्याची गरज आहे. समाजातील सर्व जातीच्या लोकांना सोबत घेवून शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली. हा विचार आणि वारसा आपण पुढे घेवून जायचे आहे.