डॉ. कैलास कदम यांची ॲथलेटिक्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड
पिंपरी चिंचवड | पुणे डिस्ट्रिक्ट ॲम्युचर ॲथलेटिक्स असोसिएशन’ हि ॲथलेटिक्स क्षेत्रात मागील अनेक वर्षांपासून काम करणारी अधिकृत संघटना आहे. या संघटनेच्या मान्यतेने ‘ॲथलेटिक्स असोसिएशन ऑफ पिंपरी चिंचवड’च्या अध्यक्षपदी डॉ. कैलास कदम यांची निवड करण्यात आली.आकुर्डी येथे संघटनेच्या झालेल्या बैठकीत सर्वानुमते डॉ. कैलास कदम यांची निवड करण्यात आली. यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष मधु देसाई, ज्ञानेश्वर मलशेट्टी, राजन चिटणीस, शशिकांत लांडगे, गणेश कुदळे, निवृत्ती काळभोर, सचिव किशोरकुमार शिंदे, खजिनदार प्रमोद मोरे, सहसचिव ॲड. पौर्णिमा जाधव, सहखजिनदार दिपाली देशपांडे, सदस्य रमेश कुदळे आदी उपस्थित होते.
डॉ. कैलास कदम हे पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे आणि इंटकचे पुणे जिल्हा अध्यक्ष आहेत. तसेच कामगार क्षेत्रात हिंद कामगार संघटना आणि इंटक या संघटनेच्या माध्यमातून कार्यरत आहेत. ॲथलेटिक्स क्षेत्रात पिंपरी चिंचवड शहरातील खेळाडूंना राज्य व राष्ट्रीय पातळीवर निवडीसाठी आवश्यक ते प्रशिक्षण, प्रशिक्षक आणि मार्गदर्शन व आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठी असोसिएशन प्रयत्न करेल अशी माहिती उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मलशेट्टी यांनी प्रसिध्दीस दिली आहे.