“…त्या चौकशीला घाबरूनच नारायण राणेंनी भाजपासमोर लाचारी पत्कारली ” ; राणेंच्या प्रहाराला शिवसेनेकडून लाव रे व्हिडिओतून प्रत्त्युतर!
![“…त्या चौकशीला घाबरूनच नारायण राणेंनी भाजपासमोर लाचारी पत्कारली ” ; राणेंच्या प्रहाराला शिवसेनेकडून लाव रे व्हिडिओतून प्रत्त्युतर!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/rane-raut.jpg)
मुंबई |
केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेत शिवसेना नेते संजय राऊत यांच्या कालच्या पत्रकार परिषदेवरून शिवसेना व संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. राणेंच्या या टीकेला शिवसेना नेते विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले. तसेच, ईडीच्या चौकशीला घाबरूनच राणेंनी भाजपासमोर लाचारी पत्कारली असल्याचंही यावेळी विनायक राऊत यांनी म्हटलं. विनायक राऊत म्हणाले की, “किरीट सोमय्या यांनी नारायण राणे यांच्यावर १०० बोगस कंपन्या निर्माण केल्याचा आरोप केला होता. असं म्हणत विनायक राऊत यांनी किरीट सोमय्या यांचा जुना व्हिडिओ दाखवून नारायण राणेंवर निशाणा साधला. त्या व्हिडिओत किरीट सोमय्या हे नारायण राणेंवर विविध गंभीर आरोप करताना दिसत आहेत.”
तसेच, “किरीट सोमय्या यांनी नारायण राणेंवर हे जे आरोप केलेले होते आणि त्यानतंर ईडीची जी चौकशी लागली, त्या चौकशीला घाबरून हे भाजपाला सरेंडर झाले, लाचारी पत्करली, शरणागती पत्कारली. म्हणून ईडीपासून त्यांचा बचाव झालेला नाही. किंबहुना आम्ही सर्व खासदार ईडीच्या कार्यालायास भेट देऊन, किरीट सोमय्या यांनी जे आरोप केलेले आहेत. त्या आरोपाची सखोल चौकशी झाली का? झाली नसेल तर केव्हा होणार. याबाबतची विचारणा ईडीच्या संचालकांकडे आम्ही येत्या एक दोन दिवसांत करणार आहोत. त्यामुळे आम्हालाही खात्री आहे की सोमय्या यांनी देखील, आज तुम्ही इतरांचे भ्रष्टाचार काढत असताना एकवेळ नारायण राणेंच्या विरोधात जे तुम्ही आरोप केले होते, जे पुरावे दिले होते. ते तुम्ही पुन्हा एकदा ईडी कार्यालयात द्याल,अशी आम्हाला आशा आहे. परंतु आम्ही मात्र ईडी कार्यालयात ईडी संचालकांना त्याबद्दल विचारणा करण्यासाठी जाणार आहोत.” असंही यावेळी सांगितलं.
याचबरोबर “नारायण राणे यांना आता भाजपाचा खूप पूळका आलेला आहे. परंतु याच नारायण राणेंनी त्यावेळी काँग्रेसमध्ये असताना विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेस उमेदवारांचा प्रचार करत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जे अश्लाघ्य असे आरोप केले होते. ” असं सांगत विनायक राऊत यांनी नारायण राणे मोदींवर टीका करतानाचा व्हिडिओ देखील दाखवला. याशिवाय नितेश राणेंनी भाजपा नेते किरीट सोमय्यांवर कसे आरोप केले होते, हे देखील व्हिडिओद्वारे पत्रकारपरिषदेत दाखवले.