घरकुल परिसरात सोयायटींचे होणार सुशोभिकरण ; स्थानिक नागरिकांमधून समाधान
![Soybeans will be beautified in Gharkul area](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/WhatsApp-Image-2022-02-15-at-21.47.10.jpeg)
आमदार महेश लांडगे यांच्या निधीतून पेव्हिंग ब्लॉक
सामाजिक कार्यकर्ते निलेश नेवाळे यांचा पुढाकार
पिंपरी । प्रतिनिधी
आमदार महेश लांडगे यांच्या आमदार निधीतून घरकुलमध्ये पेव्हिंग ब्लॉक बसवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. एफ 5, शिवतीर्थ, ए 20 लक्षपूर्ती, डी 17 शिवरत्न आणि डी 20 शिवमुद्रा या चार सोसायट्यांमध्ये पेव्हिंग ब्लॉक बसवण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते निलेश नेवाळे व घरकुल फेडरेशन अध्यक्ष सुधाकर धुरी, सामाजिक कार्यकर्ते अजय जाधव उपस्थित होते.
दरम्यान, परिसरातील सोसायटींचा परिसर सुशोभित करुन रहिवाशांसाठी चांगले वातावरण करण्याबाबत सामाजिक कार्यकर्ते निलेश नेवाळे यांनी पुढाकार घेतला असून, स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
याबाबत निलेश नेवाळे म्हणाले की, आमदार महेश लांडगे यांच्या आमदार निधीतून घरकुल परिसरातील ९९ सोसायट्यांमध्ये पेव्हिंग ब्लॉक बसवण्याचे काम पूर्ण केले आहे. आता१६ सोसायट्यांमध्ये पेव्हिंग ब्लॉक बसवण्याचे काम सुरू करण्यात आले. त्यापैकी १२ सोसायटींचे काम अंतिम टप्प्यात आहे. तसेच, ४ सोसायट्यांच्या पेव्हिंग ब्लॉकच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. उर्वरित सोसयट्यांमधील पेव्हिंग ब्लॉक बसवण्याचे कामाचे नियोजनही करण्यात आले आहे. तसेच घरकुलच्या इतर समस्या सोडवण्यासाठी सुद्धा कटिबद्ध आहोत, असेही नेवाळे यांनी म्हटले आहे.