चाकण भाजी मार्केटमध्ये टोळक्याने शेतकऱ्याला लुटले
पिंपरी l प्रतिनिधी
चाकण भाजी मार्केट येथे एका टोळक्याने दहशत निर्माण करत पुदिना विकण्यासाठी आलेल्या एका शेतक-याला शिवीगाळ करून मारहाण करण्याची धमकी देत लुटले. ही घटना बुधवारी (दि. 9) सकाळी पावणे सहा वाजता घडली.
नवनाथ संभाजी कुटे (वय 32, रा. भोसे, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अक्षय विजय कुरुळे (रा. खंडोबामाळ, चाकण), किरण इंगळ आणि अनोळखी इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बुधवारी पहाटे चाकण भाजी मार्केट येथे त्यांच्या शेतातील पुदिना विक्रीसाठी आले होते. फिर्यादी यांनी त्यांची कार भाजी मार्केट येथे पार्क केली असता आरोपी तिथे आले. आरोपींनी लाकडी दांडक्याच्या साहाय्याने भाजी मार्केट परिसरात दहशत निर्माण केली. त्यांनतर फिर्यादी यांना शिवीगाळ करत मारहाण करण्याची धमकी दिली. पुदिना विक्री करून आलेले 630 रुपये आरोपींनी जबरदस्तीने काढून घेतले. पोलीस उपनिरीक्षक विकास मडके तपास करीत आहेत.