हातभट्टीचा डाव उधळला, 17 लाखांचे साहित्य जप्त ; दोन सराईत ताब्यात
![Hatbhatti's intrigue foiled, 17 lakh items seized; In possession of two inns](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/IMG-20220204-WA0025-e1644041823477.jpg)
पिंपरी चिंचवड | हातभट्टी दारु तयार करण्यासाठीचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. याप्रकरणी दोन सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने शुक्रवारी (दि.04) दत्तनगर डुडुळगाव येथे ही कारवाई केली. यामध्ये देशी दारु तयार करण्यासाठी आवश्यक 2 हजार 988 किलो गुळ, 2 हजार 150 किलो नवसागर असा एकूण 16 लाख 91 हजार 400 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गणेश जीवन मन्नावत (वय 25, रा. सुभाषवाडी, निघोज ता.खेड) व मोहनलाल रत्नाराम देवासी (वय 42, रा. आळंदी ता. खेड) असे अटक आरोपींची नावे आहेत. तर एक आरोपी फरार झाला आहे. अटक दोन्ही आरोपी वरती विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड शहरात हातभट्टी दारु तयार करणं, विक्री, साठवणुक व वाहतुक करण्यास बंदी घातली आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी दत्तनगर डुडुळगाव येथे संतोष वहिले यांच्या पत्र्याचे शेडसमोर दोन बोलेरो पिकअप व एक टियागो कारमध्ये गावडी हातभट्टी तयार दारु व हातभट्टी दारु तयार करण्यासाठीचे साहित्य घेवून काही इसम थांबले असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांना या ठिकाणी पंचासमक्ष छापा टाकुन आरोपींना ताब्यात घेतले व मुद्देमाल जप्त केला.
तिन्ही गाड्यांमध्ये 35 लिटर मापाची प्लॅस्टीकची कॅण्ड, गुळाच्या ढेप व नवसागर भरलेली पोती असा एकूण 16 लाख 91 हजार 400 रुपये किंमतीचा माल मिळुन आला.