पिंपरी / चिंचवड
महिलेवर लैंगिक अत्याचार करण्याची धमकी देणा-यास अटक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/Rape-3.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
महिलेला अश्लील मेसेज पाठवून तसेच तिच्या बहिणीला फोन करून महिलेवर लैंगिक अत्याचार करण्याची धमकी दिली. याप्रकरणी एकास पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना 30 ते 31 जानेवारी या कालावधीमध्ये श्रीधरनगर, चिंचवड येथे घडली.
गोविंद वैजनाथ भेरे (वय 27 रा. सिंहगड रोड, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे एकाच ठिकाणी काम करतात. आरोपीने त्याच्या मोबाइलवरून फिर्यादी महिलेला अश्लील मेसेज केले. याबाबत त्याला जाब विचारला असता त्याने शिवीगाळ केली. त्यानंतर फिर्यादी यांच्या बहिणीच्या मोबाइलवर फोन करून शिवीगाळ केली. तसेच तुझ्या बहिणीवर लैंगिक अत्याचार करणार असल्याची धमकीही आरोपीने फिर्यादी यांच्या बहिणीला दिली. पोलीस उपनिरीक्षक किशोर पाटील तपास करीत आहेत.