पिंपरी चिंचवडमध्ये ३०० कोटींच्या बिटकॉईनसाठी व्यापाऱ्याचं अपहरण
पिंपरी | प्रतिनिधी
पुण्यालगतच्या पिंपरी चिंचवडमध्ये एका व्यापाऱ्याच्या अपहरणाची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी वाकड, पिंपरी चिंचवड पोलिसांनी कारवाई केली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात एका पोलिसाचा हात असल्याचंही समोर आलं आहे. बिटकॉईनमध्ये पैसे असलेल्या एका मोठ्या व्यापाऱ्याचं अपहरण करण्यात आलं होतं. विनय नाईक असं अपहरण झालेल्या व्यापाऱ्याचं नाव आहे. त्याचे बिटकॉईन क्रिप्टोकरन्सीमध्ये ३०० कोटी रुपये असल्याच अपहरणकरत्यांना समजलं होतं. त्यानंतर विनयचं अपहरण करण्यात आलं.
याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी एका पोलिस कॉन्सटेबलसह ८ लोकांना अटक केली आहे. पोलिस कॉन्सटेबल दिलीप तुकाराम खंडारेने पुणे सायबर क्राइम सेल सोबत काम केलं होतं. त्यांमुळे विनय नाईककडे बिटकॉईन क्रिप्टोकरन्सीमध्ये ३०० कोटी रुपये असल्याचं त्याला समजलं होतं. त्यानंतर त्याने आपल्या साथीदारांसह विनयचं आपहरण करण्याचा प्लॅन तयार केला. दरम्यान पोलिसांनी एकून नऊ लोकांना अटक केली आहे.