Breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र
शिराळा तालुक्यातील खवरेवाडी शिवारात तब्बल पाच गव्यांचे दर्शन
![Darshan of five cows in Khawarewadi Shivara of Shirala taluka](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/ramling-gawa.jpg)
सांगली | प्रतिनिधी
शिराळा तालुक्यातील खवरेवाडी येथील शिवारात काल सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास लहानमोठ्या तब्बल पाच गव्यांचे दर्शन घडल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. या परिसरात अशा प्रकारे रानगवे येण्याची ही पहिलीच वेळ आहे.
काल रात्री खवरेवाडीतील भोळ्याचा माळ शिवारात ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब गायकवाड, यशवंत खोत, जालिंदर पाटील, अरुण खोत, संदीप माने आणि लालासाहेब खवरे, आदिजण गेले असता त्यांना हे गवे दिसले. हे गवे वारणा नदी पार करून शाहुवाडी तालुक्यात गेल्याचे या शेतकऱ्यांनी पहिले. बिबट्याबरोबर आता गवे येऊ लागल्याने इथले शेतकरी भयभीत झाले आहेत.