Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

कुंडमळ्याच्या इंद्रायणी पात्रात बुडालेल्या तरुणीचा मृतदेह सापडला

पिंपरी – वर्षाविहाराचा आंनद घेण्यासाठी नातेवाईकासमेवत कुंङमळा (मावळ) गेलेल्या तरुणी इंद्रायणी नदी बुडाली होती. तिचा मृतदेह तब्बल 25 तासांच्या अथक शोध मोहिमेनंतर एनडीआरएफच्या जवानांना आढळून आला. शालिनी चंद्राबालन (वय 17, रा. आकुर्डी) असे बुडून मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे.

आकुर्डी येथील एका खाजगी संस्थेत शिक्षण घेणा-या शालिनी तिच्या भाऊ आणि बहिणीसोबत रविवारी इंद्रायणी नदीतील कुंडमळा फिरायला गेली होती. नदीपात्राच्या बाजूने फिरत असताना शालिनीचा अचानक पाय घसरला आणि ती नदीपात्रात पडली. पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने ती त्या प्रवाहात पोहू शकली नाही. तिला वाचविण्यासाठी तिचे भाऊ-बहीण देखील पाण्यात उतरले परंतु पाण्याच्या प्रवाहात ते दोघेही वाहून जाऊ लागले. आसपास असलेल्या लोकांच्या ही बाब निदर्शनास येताच त्यांनी भाऊ आणि बहिणीला पाण्याच्या बाहेर काढले. मात्र, शालिनी कुठेही आढळून आली नाही. तात्काळ एनडीआरएफच्या जवानांना बोलवण्यात आले. रविवारी दुपारपासून शोधकार्य सुरू होते. सोमवारी संध्याकाळी या तरुणीचा मृतदेह हाती लागला.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button