Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
भारत बायोटेकच्या इंट्रानेझल बुस्टर डोस चाचणीला डीसीजीआयची मंजुरी
![DCGI approves Bharat Biotech's intranasal booster dose test](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/nasal-vaccine_202201749323.jpg)
नवी दिल्ली | प्रतिनिधी
भारत बायोटेकच्या इंट्रानेझल बुस्टर डोस चाचणीला ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) आज परवानगी दिली. या चाचणीसाठी डीसीजीआयकडे अर्ज करणारी भारत बायोटेक ही दुसरी कंपनी आहे. या लसीत ओमिक्रॉनसह इतर कोरोना विषाणूंचे संक्रमण रोखण्याची क्षमता आहे.
कोरोनाविरुद्ध देशात सुरू असलेल्या लढाईला इंट्रनेझल लसीचा डोस वरदान ठरणार आहे. नाकातून देण्यात येणाऱ्या या कोरोना प्रतिबंधक लसीची देशात ९ ठिकाणी चाचणी केली जाणार आहे. भारत बायोटेकने कोव्हॅक्सिन ही स्वदेशी लस तयार करून कोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठे योगदान दिले. त्यानंतर आता भारत बायोटेकच्या नेझल लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला डीसीजीआयने परवानगी दिली आहे. याशिवाय कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसींच्या खुल्या बाजारातील विक्रीला डीसीजीआयने मंजुरी दिली आहे.