कुंडमळ्यात पाण्याच्या प्रवाहात एक तरुणी वाहून गेली. एकीला वाचविण्यात यश
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/6c0e5e1784002d1e407b88e13c90b92b.jpg)
पिंपरी – मावळ (जि. पुणे) येथील कुंडमळ्यात दोन तरूणी वाहून गेल्या. यातील एका तरूणीला वाचण्यात यश आले. तर दुसरीचा शोध सुरू आहे. ही घटना आज (रविवार) सांयकाळी साडेचारच्या सुमारास घडली. घटनास्थळी तळेगाव एमआयडीसी पोलीस आणि एनडीआरफचे पथक दाखल झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शालिनी आकुर्डी-निगडी येथील कॅम्प एजुकेशन सोसायटी येथे इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेत होती. शालिनी तिच्या दोन बहिणीबरोबर सेल्फी काढत असताना तिचा पाय घसरुण ती पाण्यामध्ये पडली. तिला वाचवण्यासाठी तिच्या दोघी बहिणी देखील नदीच्या प्रवाहत पडल्या. त्यांचा आरडाओरड ऐकून स्थानिक तरुण घटनास्थळी पोहचले. या तरुणांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून दोन तरुणींना पाण्याबाहेर काढले. परंतु शालिनी चंद्रबालन ही खोल पाण्यातील रांजन खळग्यांमध्ये अडकली असल्यामुळे तिचा शोध घेता आला नाही. त्यानंतर तळेगाव एमआयडीसी पोलीस घटनास्थळी पोहचले. तसेच एनडीआरएफ टीम देखील पोहचली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद हिंगोले, सुधीर वाडीले, सचिन कचोळे करीत आहेत.