अक्षय-मौनीचा “गोल्ड’ रोमांस
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/cats-1.jpg)
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या आगामी बहुचर्चित “गोल्ड’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. त्यानंतर आता चित्रपटातील पहिले गाणे “नैनो ने बांधी’ नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. हा चित्रपट हॉकी खेळावर आधारित असून स्वतंत्र देशाच्या रुपात भारताने ऑलिम्पिकमध्ये हॉकीचे पहिले सुवर्णपदक जिंकले होते. ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून देण्याचे स्वप्न असलेल्या भारतीय हॉकी टीमच्या खेळाडूंची गोष्ट या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.
मौनी रॉय हिचीही एक झलक “नैनो ने बांधी’ गाण्यात पाहायला मिळत आहे. हे गाणे प्रदर्शित होताच अवघ्या काही तासातच 5 लाखांहून अधिक जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. चित्रपटात तपन दास यांची भूमिका अक्षय साकारत आहे. हॉकी टीमचा तपन दास हा सहाय्यक व्यवस्थापक असतो.
“गोल्ड’ चित्रपटामधून टीव्ही जगतातली अभिनेत्री मौनी रॉय पहिल्यांदाच बॉलिवूडमध्ये आपले पहिले पाऊल टाकत आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1948 साली लंडनमध्ये झालेल्या 14व्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये देशाला पहिले सुवर्णपदक मिळाले होते, त्यावर हा चित्रपट आधारित आहे. स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर म्हणजेच 15 ऑगस्टला चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची कथा रिमा कागती यांनी लिहिली असून दिग्दर्शनही त्यांनीच केले आहे.