breaking-newsमहाराष्ट्रमुंबई
मुंबईत येत्या 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा
मुंबई – मुंबईसह राज्याभरात अनेक भागांत शनिवारपासूनच मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. आजही पहाटेपासूनच दक्षिण मुंबईसह पूर्व व पश्चिम उपनगरांत जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत. जोरदार पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.
येत्या २४ तासांसाठी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. शनिवारीदेखील पावसाने मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीला जोरदार तडाखा दिला. मुसळधार पावसामुळे ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली. येथील सर्व नद्या दुथडी भरून वाहत होत्या. रायगड, पालघर, ठाणे या जिल्ह्यांना पावसाने झोडपले.