एक्स्प्रेसवेवरील कळंबोली मॅकडोनाल्डमध्ये कोरोना संसर्ग, 10 कर्मचारी पॉझिटिव्ह
![Corona infection at Kalamboli McDonald's on Expressway, 10 employees positive](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/kalmaboli.jpg)
नवीन पनवेल | 14 परिसरात कोरोना संसर्ग(panvel corona update) मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या(mumbai-pune expressway) लगत असलेल्या कळंबोली मॅकडोनाल्डला (kalamboli macdonald )कोरोना विषाणु ची बाधा झाली आहे. या ठिकाणी दहा कर्मचारी कोविड पॉझिटिव्ह(10 workers positive) आल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे हा परिसर कंटेनमेंट म्हणून महापालिकेने घोषित करून मॅक्डोनाल्ड हॉटेल सील केले आहे. या परिसरात प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला आहे.(10 workers are corona positive in kalmaboli macdonalds)
पनवेल परिसरात ही तिसरी लाटेत दररोज हजारो रुग्ण आढळून येत आहेत. दिवसेंदिवस ही संख्या वाढत चालली आहे. पनवेल हे मुंबईचे प्रवेशद्वार असल्याने येथून येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या ही जास्त आहे. त्याचबरोबर नोकरी-व्यवसायानिमित्त अनेक जण मुंबई उपनगरात जातात. कळंबोली येथून मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग सुरू होतो. त्या ठिकाणीच मॅकडोनाल्ड हॉटेल आहे. त्यामुळे मुंबई पुण्याकडून ये-जा करणारे अनेक जण या ठिकाणी अल्पोपहार यासाठी थांबतात. विशेष करून विकेंडला मॅक्डोनल्ड मध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होते. ग्राहकांची संख्या इतकी मोठी असते तिच्या ठिकाणी पाय ठेवण्यासाठी सुद्धा कधीकधी जागा शिल्लक राहत नाही.