breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
धक्कादायक! उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला टेम्पोची धडक; लग्नावरून परतत असलेल्या सहा जणांचा मृत्यू
सिल्लोड |
सिल्लोडजवळ उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर छोटा टेम्पो आदळून झालेल्या अपघातात सहा वऱ्हाडींचा मृत्यु झाला. सिल्लोड-कन्नड रस्त्यावरील मोढा फाट्याजवळजवळ बुधवारच्या मध्यरात्री ही दुर्घटना घडली असून मृत सिल्लोड तालुक्यातील आहेत. ते इतर मंडळींसोबत कन्नड तालुक्यात एका विवाह समारंभाहून ते गावी परतत होते. मृतात दोन जोडप्यांचा (पती-पत्नी) समावेश आहे.