राष्ट्रसंत गाडगेबाबांचे समाजसुधारणेचे बीजारोपण सतत कार्यरत राहील – महापौर ढोरे
पिंपरी चिंचवड | राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांनी प्रबोधनाच्या माध्यमातून गावोगावी जाऊन अज्ञान, अंधश्रद्धा आणि अस्वच्छता निर्मूलनाचे महान कार्य केले आहे. त्यांनी केलेले समाजसुधारणेचे बीजारोपण सतत कार्यरत राहील असे प्रतिपादन महापौर उषा ढोरे यांनी केले.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस महापौर ढोरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी उपमहापौर हिराबाई घुले, शहर सुधारणा समिती सभापती अनुराधा गोरखे, शिक्षण समिती सभापती माधवी राजापुरे, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, माजी नगरसेवक बन्सी पारडे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते आनंद कुदळे, भाई विशाल जाधव, गजानन गवळी, संतोष भालेकर, रमेश बोंद्रे, किशोर रोकडे, राम शिंदे, सुनील अभंग, प्रशांत दळवी, समीर शिंदे, किरण लोंढे, सुमन अभंग, वैशाली राऊत, कल्पना गायकवाड, राजेश दळवी,रामेश्वर गायकवाड आदी उपस्थित होते.