चाकण, निगडी, हिंजवडीत वाहनचोरी, वाकडमध्ये घरफोडी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/bike-thief-1.jpg)
नागनाथ मल्लिकार्जुन क्षीरसागर (वय 31, रा. नाणेकरवाडी, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी त्यांची 27 हजार रुपये किमतीची दुचाकी नाणेकरवाडी येथे ज्योतिबा मंदिराकडे जाणा-या रोडवर पार्क केली. शनिवारी (दि. 18) दुपारी साडेबारा ते दीड वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने त्यांची दुचाकी चोरून नेली.
महादेव गोपाळ तांबेकर (वय 38, रा. देहूगाव) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची 12 हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी निगडी येथील पवळे उड्डाणपुलाखालून चोरून नेली. ही घटना 5 डिसेंबर रोजी सायंकाळी सात ते 6 डिसेंबर रोजी सकाळी सहा या कालावधीत घडली.
आसिफ इस्माईल काकर (वय 26, रा. नानापेठ पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे भांडेविक्रीचा व्यवसाय करतात. त्यांनी त्यांची 10 हजारांची दुचाकी शनिवारी (दि. 18) दुपारी 12.30 वाजता पंचरत्न चौक, हिंजवडी येथे पार्क केली. ते चहा पिऊन दहा मिनिटात आले असता त्यांची दुचाकी चोरीला गेल्याचे उघडकीस आले. गादीवर आठ हजारांची भांडी होती. अज्ञात चोरट्याने भांड्यासह दुचाकी चोरून नेली आहे.
विजय रमेश शेलार (वय 39, रा. कस्पटे वस्ती, वाकड. मूळ रा. साखरी रोड, धुळे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात घरफोडीबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर 14 डिसेंबर रोजी सकाळी सहा ते 18 डिसेंबर रोजी रात्री आठ वाजताच्या कालावधीत कुलूप लावून बंद होते. दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने बनावट चावीच्या साहाय्याने फिर्यादी यांच्या घराचे लॅचलॉक उघडून आत प्रवेश केला. मुलांच्या बेडरूममधील कपाटाचे लोकर तोडून त्यातून 61 हजारांचे 27 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.