Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन
करिना कपूर, अमृता अरोराला कोरोना! सुपर स्प्रेडर ठरण्याची भीती
मुंबई – कोरोना नियमांचे पालन न करता अनेक पार्ट्यांमध्ये हजेरी लावलेल्या बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर आणि अमृता अरोरा यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे या दोघी सुपर स्प्रेडर ठरण्याची भीती व्यक्त होत असून दोन्ही अभिनेत्रींच्या संपर्कातील सर्वांना आरटीपीसीआर चाचणी करण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेने दिले आहेत. करिना आणि अमृता यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची बीएमसीने कोरोना चाचणी केली आहे. त्यांच्या अहवालांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ज्यामध्ये काही मोठ्या बॉलिवूड सूपरस्टार्सची नावे असल्याची माहिती मिळाली आहे.