ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
रेल्वेच्या धडकेत एकाचा मृत्यू
पिंपरी चिंचवड | रेल्वेच्या धडकेत एका अनोळखी तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 12) सकाळी आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ घडली.रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत तरुणाची ओळखी पटलेली नसून त्याचे वय अंदाजे 30 ते 35 आहे. उंची पाच फूट पाच इंच, रंग निमगोरा, अंगाने मध्यम, दाढी-मिशी नाही. डोक्याचे केस वाढलेले असून त्याने अंगात बंदामी रंगाचा शर्ट आणि निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट, असा वेष परिधान केला आहे.
डाव्या कानात बाळी आणि उजव्या हातावर रमेश अशोक आणि टॅटू आहे. तसेच छातीवर डाव्या बाजूला रुमीना असे नाव गोंदलेले आहे. या तरुणाबाबत काही माहिती असल्यास चिंचवड रेल्वे पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस कर्मचारी संजय लोंढे यांनी केले आहे.