महामंडळाची कारवाई सुरूच, एसटी कामगार मात्र संपावर ठाम
![#STworkersAgitation: "High-level committee report cannot be released"; State Government Information in Mumbai High Court](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/st-bus.jpg)
बीड – राज्यातील संपकरी एसटी कामगारांवर एसटी महामंडळाकडून बदलीची, सेवासमाप्तीची कारवाई सुरूच आहे. मात्र या कारवाईला न जुमानता एसटी कामगारांनी आजही आपला संप सुरूच ठेवला आहे. त्यामुळे प्रवासांचे प्रचंड हाल सुरुच आहे. तसेच खासगी वाहन चालक अव्वाच्या सव्वा भाडे आकारात आहे. तसेच राज्यातील अवघे 70 एसटी डेपोतून काही प्रमाणात वाहतूक असून काही डेपोमध्ये संपकरी कामगार आंदोलन करत आहेत. मात्र आतापर्यंत संपाच्या काळात एसटी महामंडळाने 9 हजार 625 संपकरी कर्मचारी निलंबित केले. तर 1990 कामगारांची सेवासमाप्त केली आहे.
बीडमध्ये महामंडळाच्या सांगण्यावरुन पोलिसांनी काल रात्री डेपोतील संपकरी कामगारांचा मंडप काढला. मात्र आज सकाळी त्याठिकाणी कामगारांनी आणखी आक्रमक पवित्रा घेऊन आपले आंदोलन कायम ठेवले आणि जोरदार घोषणा दिल्या. मंडप काढा किंवा आमच्यावर कोणतीही कारवाई करा, विलिनीकरण झाल्यशिवाय मागे हटणार नाही, अशी भूमिका या कामगारांनी घेतली.
महामंडळाकडून आज बीडमधील 18 कामगारांच्या जिल्हअंतर्गत बदल्या केल्या आहेत. तसेच नागपुरात एसटी गाडीच्या टपावर चढून काही संपकरी कामगारांनी आंदोलन करत निषेध नोेंदवला. संगमनेर बस आगारातील 23 कामगारांचे आज निलंबन करण्यात आले. तरी देखील तेथील कामगारांनी आपला संप आजही सुरूच ठेवला. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर आमचा विश्वास असल्याचे देखील संगमनेर बस आगारातील कामगारांनी सांगितले आहे.
तसेच औरंगाबादमध्ये देखील एसटी कामगारांवर महामंडळाने बदलीची कारवाई सुरूच ठेवली. तेथील जवळपास 20 कामगारांची बदल्या केल्या. तर दुसरीकडे सिल्लोड आगारातील आतापयर्र्ंत 23 प्रशासकीय कर्मचारी रुजू झाले आहेत. पिंपरीतून आणि शिरुरमधून चार एसटी सुडल्या. यवतमाळमधील 51 एसटी कामगारांच्या बदल्याचे महामंडळाने आदेश काढला. मात्र या कारवाईला न जुमानता एसटी कामगारांनी आपला संप सुरूच ठेवला. एसटीचे पुणे विभागाचे नियंत्रण रमाकांत गायकवाड यांनी आज सकाळी बारामतीत येऊन संपकरी कर्मचार्यांची सविस्तर चर्चा केली.
एसटीची भूमिका त्यांनी कामगारांना समजून सांगितली. यानंतर त्यांच्या आवाहनाला काही एसटी कामगारांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे तेथील एसटी वाहतूक सुरु होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.