TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र
पंतप्रधान थोड्याच वेळात देशाला संबोधित करणार
![The Prime Minister will address the nation shortly](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/Modi.jpg)
पिंपरी चिंचवड | पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात देशाला संबोधित करणार आहेत. सकाळी ९ वाजता ते देशाशी संवाद साधतील. मोदी नेमकं काय बोलणार याकडे देशाचं लक्ष लागलं आहे. आज पंतप्रधान मोदी उत्तर प्रदेशचा दौरा करणार आहेत. त्याआधी ते देशवासीयांशी संवाद साधतील.पंतप्रधान कार्यालयानं सकाळी ८ च्या सुमारास मोदींच्या आजच्या कार्यक्रमांची माहिती दिली. ‘आज गुरुनानक जयंती आहे. आज पंतप्रधान सिंचन योजनांच्या लोकार्पणासाठी उत्तर प्रदेशमधल्या महोबा येथे जातील. त्यानंतर ते संध्याकाळी झांसीमध्ये राष्ट्र संरक्षण समर्पण पर्वात सहभागी होतील. त्याआधी ते सकाळी ९ वाजता देशाला संबोधित करतील,’ असं पीएमओनं ट्विटमध्ये म्हटलं आहे.